जी.एन.एम.
जनरल नर्सिंग व मिडवायफरी
१२वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा), किमान ४०% गुण
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा मंडळ मान्यताप्राप्त संस्था. अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा आणि रुग्णालयातील प्रत्यक्ष प्रशिक्षण.
✦ तमसो मा ज्योतिर्गमय ✦


कै. रघुनाथराव जगताप फाऊंडेशन (आर.जे.एफ.) ही सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था आहे. निःस्वार्थ समाजसेवेच्या हेतूने स्थापन झालेल्या या संस्थेने आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात ग्लोबल नर्सिंग स्कूलच्या रूपाने भक्कम पाऊल टाकले आहे.
गरीब, ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार नर्सिंग शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, आणि आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करणे — हेच आमचं ध्येय आहे.
नर्सिंग व पॅरामेडिकल क्षेत्रातील मान्यताप्राप्त अभ्यासक्रम.
जनरल नर्सिंग व मिडवायफरी
१२वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा), किमान ४०% गुण
ऑक्झिलरी नर्सिंग व मिडवायफरी
१२वी उत्तीर्ण (कला/वाणिज्य/विज्ञान)
संस्था कोड ६३३६२ — प्रगत डिप्लोमा अभ्यासक्रम
फक्त चार सोप्या टप्प्यांत तुमचा प्रवेश निश्चित करा.
फोन, व्हॉट्सअॅप किंवा फॉर्मद्वारे आमच्याशी संपर्क साधा.
अभ्यासक्रम, पात्रता व शुल्काबाबत मार्गदर्शन घ्या.
गुणपत्रिका, आधार व आवश्यक कागदपत्रे जमा करा.
शुल्क भरून तुमची जागा निश्चित करा.
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल व राज्य शुश्रूषा मंडळ मान्यताप्राप्त.
नामांकित रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण.
एस.सी./एस.टी./ओबीसी/एनटी/एसबीसी/व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती.
सुरक्षित व सुसज्ज वसतिगृहाची सोय उपलब्ध.
सुसज्ज नर्सिंग लॅब, प्रात्यक्षिक कक्ष व प्रशस्त वर्गखोल्या.
सरकारी, निमसरकारी व जिल्हा रुग्णालयांमध्ये नोकरीची हमखास संधी.

स. न. १९२८ मध्ये जन्मलेले रघुनाथराव जगताप हे कष्टकरी शेतकरी कुटुंबातील. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि पुढील पिढीला शिक्षणाची वाट दाखवली. त्यांच्याच स्मृतिप्रीत्यर्थ ही संस्था उभी आहे.

३० जून १९९५ रोजी जन्मलेले अक्षय पाटील हे उच्चशिक्षित इंजिनिअर. त्यांनी संस्थेमार्फत पॅरामेडिकल व नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केले. एप्रिल २०१९ मध्ये त्यांचे अकाली निधन झाले; त्यांच्या स्वप्नाला संस्था पुढे नेत आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्लोबल नर्सिंग स्कूलला जी.एन.एम. व ए.एन.एम. मान्यता मिळाली.
"आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे."
सामाजिक उपक्रम, प्रशिक्षण व कार्यक्रम.

प्रवेश, अभ्यासक्रम किंवा इतर माहितीसाठी आजच भेट द्या.
सोमवार – शुक्रवार: सकाळी ९:०० ते सायं. ५:००
शनिवार: सकाळी ९:०० ते दुपारी १:००
रविवार: बंद